बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माजी गृहमंत्री हनिमूनला गेलेत का?’; अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई | मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात समन्स बजावण्यात आलं होतं. तरी देखील परमबीर सिंह न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यानंतर परमबीर सिंह बेपत्ता असल्याची माहिती आज राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकारण चांगलंच पेटलेलं दिसून येतंय. अशातच आता विरोधी पक्षनेते यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह कुठे हनिमूनला गेलेत का? असा सवाल अमृता फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. एक पोलीस कमिश्नर असो किंवा माजी गृहमंत्री असो, त्यांचे कुठे हनिमून चाललेत आपल्याला माहीत नाही. पण असं व्हायला नको, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. तुम्हाला ते दोघं पण कुठे दिसले तर रिपोर्ट करा, त्यामुळे त्या लोकांना लवकरात लवकर पकडता येईल, असंही फडणवीस म्हणाल्या.

इथं लोक ड्रग्ज घेऊन फिरतात. महाराष्ट्राला ड्रग्ज कॅपिटल करायचंय की प्रगतीच्या दृष्टीने पुढे जायचंय हे आपणच ठरवायचं आहे, असंही फडणवीस यावेळी म्हणाल्या आहेत. देशातील यंग जनरेशने तुरूंगात जावं अशी माझी वयक्तिक इच्छा नाही, परंतु त्यांच्यासाठी सुधारणागृहाची गरज आहे, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी एनसीबीच्या कारवाईचं समर्थन देखील केलं आहे. जर सामनातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली तर त्यांचं वसुली सरकार कसं चालेल? असा खोचक सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला आहे.

थोडक्यात बातम्या-

तुमचा लॅपटॉप हॅंग होतोय का? मग वाचा ‘या’ भन्नाट टिप्स

सचिन सावंत यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात खळबळ

अखेर रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड!

‘…तर केंद्र सरकार विकावं लागेल’; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं इंधन दरवाढीचं कारण

“सत्तेत असला तरी चुकीचं वागू नका, सर्वांना नियम सारखेच आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More