अर्जेंटिना | जगप्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं निधन झालंय. वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतलाय. फुटबॉलचा जादूगार हरपल्याने फुटबॉल चाहत्यांवर शोककळा पसरलीये.
1986 साली आपल्या खेळीने अर्जेंटिनाला विश्वचषकाचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर मॅराडोना यांचं नाव फुटबॉलविश्वात प्रसिद्ध झालं होतं. ‘हँड ऑफ गॉड’ अशी मॅराडोना यांची ओळख होती.
मॅराडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. काही आठवड्यांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. एका अपघातानंतर मॅराडोना यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता.
अर्जेंटिनाच्या संघाकडून त्यांनी 91 सामन्यांमध्ये तब्बल 34 गोल करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं होतं. अखंड फुटबॉल कारकिर्दीमध्ये त्यांनी 259 गोल केलेत.
महत्वाच्या बातम्या-
ईडीच्या लोकांनी घरी छान नाश्ता, जेवण केलं….; प्रताप सरनाईकांचा खुलासा
मुंबई- महाराष्ट्रावरही कोरोनाची टांगती तलवार, शिवसेनेचा सर्तकतेचा सल्ला
विशेष पथके नेमून तातडीने आष्टीतील बिबट्याला जेरबंद करा- धनंजय मुंडे
अहमद पटेल यांच्या निधनाने महाविकास आघाडीने मार्गदर्शक गमावला- मुख्यमंत्री
कष्टकऱ्यांची भाऊबीज हा कष्टाला प्रतिष्ठा देणार उपक्रम -राधाकृष्ण विखे पाटील