बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सातारा जिल्ह्यातील कुटुंब राबवत आहे पाकिस्तानात ‘हा’ आगळावेगळा उपक्रम

सातारा | सातारा जिल्ह्यातील एका कुटुंबाने आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. दिलीप पुराणिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी पाकिस्तानमध्ये राहत असलेल्या मराठी बांधवांचा शोध घेतला आहे. तिथल्या मराठी लोकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी पुराणिक कुटुंब धडपड करत आहे.

लॉकडाऊनमध्ये अनेकांनी घरी बसून नवनवीन गोष्टी केल्या. याच लॉकडाऊनमध्ये दिलीप पुराणिक यांनी चक्क पाकिस्तानमध्ये राहत असणाऱ्या तब्बल 500 मराठी कुटुंबांना शोधून काढलं. त्यानंतर मराठी भाषा शिकवण्याच्या या आगळावेगळ्या उपक्रमाला सुरुवात केली.

पुराणिक कुटुंबियांनी इंटरनेटच्या मदतीने झूम मिटिंगद्वारे दर रविवारी मराठीची ऑनलाइन शिकवणी सुरु केली होती. आता हा उपक्रम मोहिम बनली आहे असून आता या उपक्रमाला मोठं यश मिळतं आहे. पाकिस्तानमधील बऱ्याच कुटुंबियांना मराठी भाषा शिकायची इच्छा आहे. त्यांची ही इच्छा आता पुराणिक कुटुंबिय पूर्ण करत आहेत. इंटरनेटवर दर रविवारी ऑनलाइन क्लासेस घेतले जातात. या वर्गात पाकिस्तानातील मराठी लोकांचं कुटुंब आता येऊ लागलं आहे. त्यासोबतच या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचा इतिहास शिकवला जाऊ लागला आहे.

दरम्यान, पाकिस्तानमधील मराठी बांधवांनाही आपल्या मातृभाषेविषयी प्रेम आणि आस्था आहे. त्यामुळेच त्यांची मराठी शिकण्याची धडपड स्पष्ट दिसत आहे. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन सगळीकडे साजरा करण्यात आला. त्याचवेळी दिलीप पुराणिक यांनी कराची येथील मराठी बांधवांसोबत मराठी भाषा दिन ऑनलाईन साजरा केला आहे. या कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी हे उपस्थित राहिले होते. दरम्यान पाकिस्तानमधील मराठी बांधवांचा नेमका काय इतिहास आहे हे अमोल कोल्हे यांनी कराची येथील मराठी बांधवांकडून जाणुन घेतलं.

थोडक्यात बातम्या

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फारच सरळमार्गी नेते आहेत”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर सोपवली ‘ही’ जबाबदारी, म्हणाले…

संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची गरज नव्हती, पण…- संजय राऊत

‘मुख्यमंत्र्यांचं आता त्यांचे युवराजही ऐकत नाहीत का?’; व्हिडिओ शेअर करत मनसे नेत्याची आदित्य ठाकरेंवर टीका

“काही लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दुकानं चालवून संसदेत जातात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More