बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्राला 20 कोटी लस मिळणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अदर पुनावालांशी चर्चा

मुंबई | कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार लसीकरणावर भर द्यायचा प्रयत्न करत आहे. पण केंद्र सरकार राज्याला पुरेश्या प्रमाणात लस देत नाही, असा आरोप केला जात होता. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला 50 टक्के लसींचा साठा हा थेट लसनिर्मात्या कंपन्यांशी बोलणी करुन विकत घेण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे आता राज्यांना देखील दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळ न घालवता सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रमुखांशी चर्चा केली.

केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्याची मुभा दिली आहे. त्यानंतर आता ठाकरे सरकार थेट लस उत्पादक कंपन्यांकडून लस घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सिरम इन्सिट्यूटकडून कोव्हीशिल्ड लस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सिरमचे प्रमुख अदर पुनावाला यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या महाराष्ट्राला 20 कोटी लसींची गरज आहे. परंतू केंद्र सरकारच्या वाटपामुळे महाराष्ट्राला कमी लस मिळत असल्याचा आरोप केला जात होता. 18 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची मुभा दिल्यामुळे 5.5 कोटी लसीची गरज नव्याने निर्माण झाली आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी अदर पुनावाला यांच्याशी सविस्तर चर्चा केली, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दरम्यान, सध्या कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. अदर पुनावाला यांनी 24 मे पर्यंत सिरममध्ये उत्पादित होणाऱ्या लसी केंद्र सरकारने अगोदरच बूक करून ठेवल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राला 20 कोटी लस कधी मिळणार,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“18 वर्षापुढील सर्वांसाठी मुख्यमंत्र्यांनी मोफत लसीकरणाचा कार्यक्रम जाहीर करावा”

“रेमडेसिविर, ऑक्सिजनशिवाय 85 टक्के रुग्ण बरे होतायेत”

“संकट मोठं आहे, तुमचं तुम्ही बघा, काळजी घ्या…”

‘महाराष्ट्राचा असा छळ कशासाठी ?’; जितेंद्र आव्हाडांचा केंद्र सरकारला सवाल

नाशिकच्या घटनेनंतर पुणे महापालिकेला खडबडून जाग; महापौरांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More