Top News देश

“महाराष्ट्रातही सरकार पाडण्याची चर्चा”; काॅंग्रेस नेत्याच्या दाव्यानं खळबळ

जयपूर |  राजस्थानमध्ये मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पुन्हा राजकीय खळबळ उडाली आहे. सरकार पाडण्याचा खेळ पुन्हा सुरू होणार असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला आहे.

राजस्थानमध्ये सरकार पाडण्याचा खेळ पुन्हा सुरू होणार आहे. भाजप सरकार पाडण्याचा कट रचत आहे. महाराष्ट्रातही सरकार पाडण्याची चर्चा आहे, असं कॉंग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करतांना अशोक गहलोत म्हणाले.

भाजपने यापूर्वी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस नेते अजय माकन हे याचे साक्षीदार आहेत. राजस्थानमधील कॉंग्रेस प्रभारी अजय माकन हे यामुळे काँग्रेस आमदारांसोबत हॉटेलमध्ये ३४ दिवस राहिले होते, असं गहलोत म्हणाले.

तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसच्या आमदारांची भेट घेतली. काँग्रेसची पाच सरकारं पाडली आहेत. आता सहावं सरकार पडणार आहे, असं चहा-नाश्ता करताना अमित शहा आमदारांना म्हणाले, असा आरोपही गहलोत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मुख्यमंत्री महोदय, डिसले गुरुजींना महाराष्ट्र भूषण देऊन सन्मानित करा”

रेखा जरे हत्याकांडप्रकरणी महत्त्वाची घडामोड; आता ही व्यक्ती चौकशीच्या फेऱ्यात

दिल जीत लिया दिलजीत!; शेतकऱ्यांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी दिले 1 कोटी

“मंत्रिपद गेलं तरी चालेल, ओबीसी आरक्षणाला कोण हात लावतो ते पाहू”

नो मराठी… नो ॲमेझॉन; ॲमेझॉनविरोधात मनसेची नवी मोहीम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या