बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ब्रेकिंग! पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पेट्रोल, डिझेल न देण्याचा निर्णय

कोल्हापूर | गेल्या तीन- चार दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील सातारा, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरमध्येही पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती होण्याची दाट शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमध्ये नागरिकांना पेट्रोले-डिझेल न देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेंमधील वाहनांनाच पेट्रोल देता येणार आहे. कोल्हापुरमधील मुख्य रस्त्यांवर पाणी साचलं आहे. जर येत्या काही तासांत मुसळधार पाऊस सुरू राहिला तर रस्ते पूर्णपणे बंद होऊ शकतात.

अत्यावश्यक सेवेतील वाहनांना जिल्हाधिकारी कार्यालयातून पास दिले जाणार आहेत. केवळ पास धारकांनाच कोल्हापुरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल उपलब्ध होणार आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवरही बंधन घालता येईल.

दरम्यान, सांगली-कोल्हापूर बायपास महामार्ग बंद झाला आहे. उदगावयेथील रेल्वे पुलाजवळील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. पाणी सखल भागात शिरल्याने शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. एनडीआरएफच्या तुकड्या लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं काम करत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर, सांगलीतील ‘या’ गावाला चारही बाजूने पाण्याचा वेढा!

इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या, सरकारी पक्षाकडून उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल

ह्रदयद्रावक! पुराचं पाणी शिरल्याने चिपळूणच्या कोविड सेंटरमधील व्हेंटिलेटरवरील 8 रुग्णांचा मृत्यू

‘राजने नव्या अ‍ॅपसाठी सई ताम्हणकरलासुद्धा…’; पॉर्नोग्राफी केसमध्ये गहनाचा धक्कादायक खुलासा!

“‘मुख्यमंत्री मंत्रालयात गेले’ ही बातमी व्हावी इतके वाईट दिवस महाराष्ट्रावर आलेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More