#Video | तरुण शेतकऱ्याची आत्महत्येची धमकी आणि मंत्र्यांचा मुर्दाडपणा

मुंबई | शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर असताना जिवावर उदार झालेल्या तरुणाला भेटण्यासाठी मुर्दाड मंत्र्यांना चक्क दीड तासाने वेळ मिळाला. उभ्या महाराष्ट्राने आज हा धक्कादायक प्रकार अनुभवला. 

कृषीमंत्र्यांना आपली कैफियत ऐकवण्यासाठी उस्मानाबादचा ज्ञानेश्वर साळवे नावाचा शेतकरी तरुण मुंबईत आला होता. मात्र त्याला ना कृषीमंत्र्यांना भेटता आलं, ना आपल्या व्यथा मांडता आल्या. अखेर मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर चढून त्याने मंत्र्यांना भेटण्याची याचना केली, नाहीतर आत्महत्या करेन, अशी धमकी दिली. 

कहर म्हणजे हा धक्कादायक प्रकार सुरु असताना त्याच मंत्रालयात असलेल्या मंत्र्यांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल पाऊण तासांचा वेळ लागला. ज्यांच्या जिवावर राज्यकर्ते निवडून जातात त्यांच्याप्रति ते किती गांभीर्याने विचार करतात, यानिमित्ताने हे पुन्हा अधोरेखित झालं. 

सोयाबीन आणि कापसाचा पडलेला भाव यामुळे ज्ञानेश्वरनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. त्याला पोलीस आणि अग्नीशमन दलाने तब्बल पाऊण तासाच्या प्रयत्नांनंतर सुरक्षित खाली उतरवलं.