बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘जा आणि मरा…तुमची जी इच्छा आहे ते करा’; पालकांच्या प्रश्नांवर शिक्षणमंत्री भडकले

भोपाळ | कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कोरोनाच्या दोन्ही लाटेत देशभरात 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्याची माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे इंधनाच्या किंमती आणि वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागलेली दिसत आहे. त्यातच आता शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी वसूल करत आहेत. या शाळांविरूद्ध तक्रार करायला गेलेल्या पालकांवरच शिक्षणमंत्री भडकल्याचा प्रकार मध्य प्रदेशात घडला आहे.

मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाने कोरोना महामारी दरम्यान शाळांना अतिरिक्त फी घेऊ नये, असा आदेश दिला आहे. त्यानंतर देखील मध्य प्रदेशच्या काही शाळा विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अतिरिक्त फी घेत आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची पायमल्ली झाल्यानं पालकांनी थेट शिक्षणमंत्र्यांना गाठलं. मध्य प्रदेश पालक महासंघाच्या नेतृत्वात 90 ते 100 पालक मध्य प्रदेशचे शिक्षणमंत्री इंदर सिंग परमार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.

पालकांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शाळा जास्त फी घेत असल्याची तक्रार केली. पालकांनी शिक्षणमंत्र्यांकडे तक्रारींचा पाठा वाचला. जर शिक्षण विभाग आमचं म्हणणं ऐकून घेणार नसेल तर काय करावं असं सवाल पालकांनी केला, त्यानंतर शिक्षणमंत्रीच पालकांवर भडकले. जा आणि मरा…तुमची जी इच्छा आहे ते करा, असं उत्तर शिक्षणमंत्र्यांनी पालकांना दिलं. थेट आपल्या खात्यावर आरोप झाल्यानं शिक्षणमंत्री संतापले.

दरम्यान, इंदर सिंग परमार यांनी पालकांची माफी मागितली पाहिजे तसंच गाऱ्हाणं ऐकण्याची इच्छा नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी पालक महासंघाचे अध्यक्ष कमल विश्वकर्मा यांनी केली आहे. तर काँग्रेसनेही शिक्षणमंत्री इंदर सिंग परमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता मध्यप्रदेशमधील भाजप सरकार अडचणीत आल्याचं चित्र आहे.

थोडक्यात बातम्या-

अँटीबाॅडी तयार न झाल्यानं अदर पूनावाला यांच्यासह 7 जणांविरोधात न्यायालयात अर्ज

“काँग्रेसमध्ये आधी माझ्या शब्दाला किंमत होती, आता काँग्रेसमधली विचारांची परंपरा संपत चाललीये”

सावधान! कोरोना रुग्णांमध्ये आढळलं ‘हे’ नवीन गंभीर लक्षण

‘ही’ लस कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटवर प्रभावी; अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेचा दावा

“ज्या पवारांनी त्यांची जात काढली, त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून राजू शेट्टींना अश्रू ढाळावे लागतायत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More