बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विराट-अनुष्काकडे आहे ‘इतकी’ संपत्ती; आकडा वाचून थक्क व्हाल

मुंबई | आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायची अनेकांना इच्छा असते. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या सेलिब्रिटी कपलची पॉवर कपल म्हणून देखील ओळख आहे.

विराट कोहली असो किंवा अनुष्का शर्मा या दोघांनीही त्यांच्या मेहनतीवर आपल्या आपल्या क्षेत्रात नाव कमावलं आहे. त्यामुळे विराट कोहली आणि अनुष्का शर्माने त्यांच्या मेहनतीने कमावलेली संपत्ती नक्कीच कौतुकास्पद आहे. विराट-अनुष्का दोघांची मिळून कोट्यवधींची संपत्ती आहे.

एका मीडिया अहवालानुसार, विराट कोहलीची 900 कोटींची संपत्ती आहे. तर विराट आणि अनुष्का दोघांकडे मिळून 1200 कोटी रूपयांची संपत्ती आहे. विराट-अनुष्काच्या मुंबईतील राहत्या घराचीच किंमत 34 कोटी आहे. इतकंच नाही तर विरुष्काचं दिल्लीत देखील एक आलिशान घर आहे.

दरम्यान, विरूष्काला महागड्या गाड्यांची देखील आवड आहे. तर अनुष्का शर्माचं प्रोडक्शन हाऊस असून तिचा भाऊ याचे सर्व सूत्र सांभाळतो. आयबीटाईम्सच्या वृत्तानूसार, विराट कोहली व अनुष्का शर्माची नेटवर्थ ही तब्बल 12 अब्ज रूपयांची आहे.

थोडक्यात बातम्या-

40 दिवसांपासून ना अन्न आहे ना पाणी, युक्रेनियन नागरिकांची बिकट परिस्थिती

14 व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबेना, वाचा आजचे दर

पेट्रोल-डिझेलपाठोपाठ CNG च्या दरातही वाढ; वाचा आजचे दर

राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More