बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicronने टेन्शन वाढवलं! आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

सिंगापूर | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. वेगाने पसरत असलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा (Omicron Varient) अखेर भारतात शिरकाव झाला. त्यामुळे भीतीचं वातावरण पहायला मिळत आहे. लसीकरण मोहीम आता पुर्ण करण्यावर जोर दिला जातोय. तर बुस्टर डोसची (Booster dose) देखील मागणी होत आहे.

बुस्टर डोस घेतलेल्या दोन सिंगापूरच्या Omicron चे प्राथमिक अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत. विमानतळावरील चाचणी दरम्यान 24 वर्षीय मुलीच्या प्राथमिक अहवालात ओमिक्रॉनची लागण झाल्याचं सापडलं. त्याचवेळी 6 डिसेंबरला जर्मनीहून परतलेल्या एका प्रवाशामध्येही ओमिक्रॉन व्हेरियंट सापडला आहे. या व्यक्तीने कोरोना लसीचा बुस्टर डोसही घेतला होता.

कोरोनाच्या Omicronची बाधा झाल्यानंतर त्यांना विलीगीकरणात ठेवण्यात आलं होतं. Omicronचा धोका पाहता आता जगातील अनेक देशांनी Booster dose देण्यास सुरूवात केली आहे. अमेरिकेत देखील बुस्टर डोसला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच भारतात देखील बुस्टर डोस देण्याची परवानगी देण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, बुस्टर डोस घेतला तरी आता ओमिक्राॅनची बाधा होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता बुस्टर डोसचा प्रभाव कितपत असणार यावर आता सरकारने स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.

थोडक्यात बातम्या-

‘आता तरी तुमच्या घरातील ‘तो’ आवाज बंद होईल’; अनुष्का शर्माच्या हटके शुभेच्छा

चहलच्या बायकोने केली धोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ची COPY अन्…; पाहा व्हिडीओ

रोहित शर्माचा उत्तराधिकारी कोण? ‘या’ तीन खेळाडूंचं नाव चर्चेत

‘लग्नाला नाही बोलवलं एकवेळ चालेल पण लग्नानंतर नाही बोलावलं तर…’; कंडोम कंपनीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

“सुप्रिया ताई, मन मोठं करा अन् अजितदादांना ‘हा’ सल्ला द्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More