कुत्र्याची चक्क महापौरपदी निवड; मांजर, लांडगा, गाढवाचा केला पराभव!

न्यूयॉर्क | अमेरिकेत लोकांनी चक्क एका कुत्र्याला आपला महापौर म्हणून निवडलं आहे. कॅलिफोर्निया राज्यातील इडिलवाईल्ड शहरात ही आश्चर्यजनक घटना घडली आहे. ही महापौर निवड केवळ प्रतिकात्मक असणार आहे.

महापौरपदासाठी मांजर, लांडगा आणि गाढव हेही शर्यतीत होते. मात्र अखेर कुत्र्याने त्यात बाजी मारली. मॅक्स असं या कुत्र्याचं नाव आहे. त्याला आता महापौराला मिळणाऱ्या सर्व सोईसुविधा मिळणार आहेत. 

मेयर मॅक्स नावाने त्याचे अधिकृत फेसबुक पेज सुरु करण्यात आले आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. मॅक्सचा भाऊ माईकी आणि बहिण मित्जी यांना उपमहापौर बनवण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-गणपती बाप्पा प्रसन्न होतो, पाहिजे त्याला अपत्यही देतो- विश्वास नांगरे-पाटील

-रोहित शर्माच्या टीम इंडियाकडून पाकिस्तानचा अक्षरशः धुव्वा

-शून्यावर बाद झाला धोनी; संतापलेल्या छोट्या फॅनने डोक्यावर घेतलं मैदान!

-शरद पवार मैदानात; लोक म्हणतात, भारताचा विजय पक्का!

-डीजेचा आवाज बंदच राहणार; राज्य सरकार आपल्या निर्णयावर ठाम