बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात गुन्हा दाखल; पत्नीने केले ‘हे’ गंभीर आरोप

पुणे | मराठी कलाविश्वातील ओळखीचा चेहरा आणि प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव अडचणीत सापडला आहे. अनिकेत विश्वासराव आणि त्याच्या आई-वडिलांवर गंभीर आरोप करत त्याची पत्नी स्नेहा चव्हाण हिने पोलिसात धाव घेतली आहे. स्नेहा चव्हाणने केलेल्या गंभीर आरोपांची दखल घेत पोलिसांनी अनिकेत आणि त्याच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे.

स्नेहा चव्हाण हिने पती अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू आदिती विश्वासराव या तिघांवर मारहाण आणि कौटुंबिक हिंसाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. तर तिला गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही स्नेहा चव्हाणने केला आहे. तर स्नेहाने या तिघांविरोधात पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून स्नेहा चव्हाण हिने पोलिसांकडे धाव घेतली. तर सिनेसृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीचं नाव मोठं होईल या भीतीपोटी अनिकेतने स्नेहाला 10 डिसेंबर 2018 ते 2 फेब्रुवारी 2021 या कालावधीत नातेवाईकांसमोर अनेकदा अपमानास्पद वागणूक दिली आणि गळा दाबून जीवे मारण्याची धमकी देखील दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेतची पत्नी स्नेहा चव्हाण हिने नोंदवलेल्या तक्रारीत अनिकेत विश्वासरावला त्याच्या आई आदिती आणि वडिल चंद्रकांत यांनी वेळोवेळी साथ देण्याचं काम केलं असल्याचं नमूद आहे. या सगळ्या आधारावर अनिकेत विश्वासराव आणि त्याच्या आई-वडिलांविरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

ज्या न्यायाधीशांनी अनिल देशमुखांना घरचं जेवण नाकारलं त्यांना थेट बदली करूनच पाठवलं

खळबळजनक! 10 हजार द्या अन् बोगस कोरोना रूग्ण घ्या

राज्यातील ‘या’ भागात पुढचे 4-5 दिवस विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता

हजारो पुणेकरांना लसीचा एकही डोस नाही; लसीचे दोन्ही डोस कधी पूर्ण होणार?

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत काही प्रमाणात वाढ, पाहा आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More