वॉशिंग्टन | अमेरिकेत कोरोना व्हायरसचा उद्रेक वाढत असताना कोरोनाचा धोका ऑगस्टपर्यंत कायम राहण्याची शक्यता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.
आपण योग्य काळजी घेतली तर देशातील मृतांची संख्या नक्कीच कमी होईल असं मला वाटतं, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ते व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परषदेत बोलत होते.
कोरोना विषाणूचे संक्रमण आणि त्याचा प्रसार रोखण्यास आपल्या प्रत्येकाला अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडायची असून कठोरपणे प्रयत्न करायचे आहेत, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, चीनपाठोपाठ कोरोना व्हायरसने अमेरिकेतही हातपाय पसरल्याने अमेरिकन प्रशासन हादरून गेलं असून अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
‘येस बँक’ निर्बंधमुक्त; 50 हजारांवरील रक्कम काढण्यास मुभा
“राजभवनाच्या भिंतींना वाचाळ तोंड आहे हे मलिक यांनी उघड केलं”
महत्वाच्या बातम्या-
पुण्यात आणखी एक कोरोनाग्रस्त, ‘फ्रान्स रिटर्न’ महिलेला लागण
ट्रम्प कोरोनाला म्हणाले ‘चिनी व्हायरस’; संतापलेल्या चीननं केली ही कारवाई
राज्य सरकारचे आदेश धुडकावून शाहिदसाठी उघडली जिम
Comments are closed.