बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“प्रत्येकाला नाही, फक्त अडकलेल्या नागरिकांना घरी सोडा”

नवी दिल्ली | केंद्र सरकारनं देशभरात ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना घरी जाण्यास मुभा दिली आहे. त्यानंतर राज्यांनी अडकलेल्या नागरिकांबरोबरच कामगारांनाही घरी पाठवण्यास सुरूवात केली असून, केंद्र सरकारनं यावरून राज्यांना फटकारलं आहे.

3 मे रोजी दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनची मुदत संपवण्यापूर्वी राज्यांनी केंद्राकडं अडकलेल्या नागरिकांना परत पाठवण्याची आणि आणण्याची मागणी केंद्राकडे केली होती. त्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यासही केंद्रानं परवानगी दिली.

केंद्राच्या या निर्णयानंतर अनेक राज्यांनी रेल्वे आणि बस आरक्षित करण्यासाठी केंद्राकडं धाव घेतली आहे. रेल्वे आणि बस आरक्षणाची मागणी वाढल्यानंतर केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना झापलं आहे.

दरम्यान, ज्यांना जवळच्या गावांना नेहमी प्रमाणे भेट द्यायची आहे. त्यांना घरी सोडू नका. लॉकडाउनची कल्पना नसताना जे घरापासून दूर अडकून पडले आहेत. त्यामुळे तणावात आहेत, अशा लोकांनाच घरी जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे, असं केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी म्हटलं आहे .

ट्रेंडिंग बातम्या-

‘असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद’; अखिलेश यादव यांची मोदींवर टीका

“काहीजण काँग्रेसच्या तालावर टिपऱ्या खेळत आहेत”

महत्वाच्या बातम्या-

…तुम्ही दुसऱ्या रुग्णालयात जा असं सांगितलं जातंय; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

लॉकडाउनमध्ये थोडा दिलासा; ‘या’ ठिकाणी बससेवा होणार सुरू

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलाची तहसीलदाराला मारहाण, हे आहे खरं कारण…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More