बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून भारतात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांनी सांगितलं कारण

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसताना दिसत आहे. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. या परिस्थितीवर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांचे प्रमुख आरोग्य सल्लागार असलेल्या डॉ. अँथॉनी फाऊची यांनी प्रतिक्रिया दिलीये.

कोरोना महामारी संपली असा चुकीचा समज तयार करुन भारताने वेळेआधीच लॉकडाऊन काढल्याने सध्या देश गंभीर संकटात अडकल्याचं डॉ. अँथॉनी फाऊची यांनी म्हटलं आहे. कोरोना प्रतिक्रियांवरील सुनावणी दरम्यान डॉ. अँथॉनी फाऊची बोलत होते.

भारतात काही दिवस लॉकडाऊन गरजेचा आहे. लॉकडाऊन केल्यास या कठीण काळात अत्यावश्यक पावलं उचलण्यास वेळ मिळेल, असं डॉ. अँथॉनी फाऊची यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.

भारतानं लसीकणावर भर द्यायला हवा. भारतातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. ती सुधारण्यासाठी तत्काळ काही पावलं उचलणं गरजेचं असल्याचं मत डॉ. अँथॉनी फाऊची यांनी व्यक्त केलं आहे. भारतात 6 महिने लॉकडाऊन करण्याची आवश्यकता नाही. काही आठवड्यांचा लॉकडाऊन केल्यास कोरोनाची संक्रमणाची साखळी खंडित करता येईल. या कालावधीचा वापर कोरोना संकटाचा सामना करण्याच्या तयारीसाठी करता येईल, असं फाऊची म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या- 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले हे 6 मोठे निर्णय; पाहा एका क्लिकवर

आनंदाची बातमी… पुण्यात आज नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त!

दिलासादायक बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या अधिक

मोठी बातमी : महाराष्ट्रातील लॅाकडाऊन ‘या’ तारखेपर्यंत वाढवण्यावर मंत्रिमंडळात एकमत

मोठी बातमी! 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण तूर्तास बंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More