बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आई-बाप दगड फोडायचे; मात्र बेलदाराचं पोर झालं डीवायएसपी!

सांगली | आई-बाप दगड फोडून कुटुंबाचा चरितार्थ चालवायचे, मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी काही कमी पडू दिलं नाही. पोरगं शिकलं इंजिनिअर झालं, पुण्यात नोकरीला लागलं. मात्र ८ तास उभं राहून नोकरी करण्यासाठी आपला जन्म नाही, असा चंग बांधून चक्क डीवायएसपी झालं.

ही यशोगाथा आहे मूळच्या नागज (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथील अमर मोहिते यांची. नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी डीवायएसपी पदाला गवसणी घातली आहे.

मानसिंग आणि रेखा मोहिते यांनी यांनी आपला मुलगा साहेब व्हावा आणि त्याच्यामुळे आपल्यालाही समाजात मान-सन्मान मिळावा म्हणून प्रचंड कष्ट घेतले. घरी अठराविश्व दारिद्र्य होतं. सरळ उभं राहता येणार नाही, एवढं घर ठेगणं होतं. मात्र अमर यांनी आपल्या कर्तृत्वानं आपल्या आई-वडिलांसोबत घराण्याचीही उंची वाढवली आहे.

पुण्यातील नोकरी सोडल्यानंतर अमर यांनी ‘एसीबी’चे उपअधीक्षक दीपक कांबळे यांनी मंगरुळमध्ये सुरु केलेल्या ‘नालंदा स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रात’ अभ्यासाला सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी ‘उपशिक्षणाधिकारी’ पोस्ट मिळाली, तर दुसऱ्या प्रयत्नात डीवायएसपीपदाला गवसणी घातली.

आई, वडील आणि लहान भाऊ या तिघांनीही प्रचंड कष्टातून संघर्षाची बीजे पेरली होती आणि अमर यांनीही त्यांचे कष्ट वाया जावू दिले नाही. अमर यांनी तर ‘बेलदाराचं पोर’ ही ओळखच पूसून टाकत आता ‘डीवायएसपी अमर मोहिते’ ही नवीन ओळख निर्माण केली.

अभ्यास करत असतानाच दगड फोडणारे आई-वडील, कष्ट करणारा लहान भाऊ माझ्यासाठी आदर्श होते. मला कितीही दु:ख झाले तरी त्यांनी कधी विचार केला नाही. इस्लामपूरमध्ये काही दिवस अभ्यास करत असताना पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे यांनी आर्थिक मदत केल्याचंही अमर यांनी ‘थोडक्यात’शी बोलताना सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

श्रीगोंद्याच्या २ भावांची कमाल… एकाची उपजिल्हाधिकारी तर दुसऱ्याची नायब तहसिलदारपदी निवड!

बापानं प्रसंगी सालदार बनून मुलाला शिकवलं, पोरानं उपजिल्हाधिकारी बनून पांग फेडलं!

वडील टेम्पोवर ड्रायव्हिंग करत होते, त्यांना तिथंच कळालं आपला मुलगा तहसीलदार झाला!

भंगार गोळा करणाऱ्या बापाचा लेक झाला नायब तहसीलदार, बापाचे आनंदाश्रू थांबेना…!

शेतकऱ्याचा लेक बनला ‘गरूड कमांडो’.. देशात 59 वा क्रमांक मिळवून आई बापाच्या कष्टाचं चीज!

जिद्दीला सलाम! शेतकऱ्याची लेक बनली तहसीलदार तर जावई सीमेवर करतोय देश सेवा

महत्वाच्या बातम्या-

…तर कोरोनाचा उद्रेक अटळ, तुकाराम मुंढे यांचा गंभीर इशारा

“भविष्यात कोरोनासारखं कोणतंही संकट आलं तरी आपली आरोग्य व्यवस्था लढा देईल अशी सक्षम करू”

गणेश मुर्तींची उंची कमी करा आणि उत्सवाची वाढवा- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More