महाराष्ट्र मुंबई

कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल- रोहित पवार

मुंबई | कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल. ईडीच्या माध्यमातून भाजपकडून विरोधकांना लक्ष्य केलं जात आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय.

रोहित पवार यांनी मंगळवारी पहाटे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटला भेट दिली. यावेळी रोहित पवारांनी विविध विषयांवर भाष्य केलं. शेतकरी वर्गाच्या संरक्षणासाठी एपीएमसी मार्केटची गरज असल्याचं रोहित पवार म्हणालेत.

केंद्र सरकारने राज्य सरकारवर कृषी कायदा लादला आहे. मात्र राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल, असं आश्वासन रोहित पवार यांनी दिलं आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत भाजपची भूमिका हुकूमशाहीची असल्याचं म्हणत रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

थोडक्यात बातम्या-

लसीकरणानंतर दुष्परिणाम झाल्यास उपचाराची तयारी ठेवा- उद्धव ठाकरे

जळगावातील खळबळजनक घटना; पैशाचं आमिष दाखवून 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

कोरोनाच्या नव्या प्रकाराने इंग्लंडमध्ये थैमान; बोरिस जॉन्सन यांच्याकडून पुन्हा लॉकडाऊनची घोषणा

सोहेल खान, त्यांचा मुलगा निर्वाण खान आणि अरबाज खानविरोधात FIR दाखल!

‘महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकाराल का?’; नाना म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या