‘एक मराठा, लाख मराठा’ सिनेमाचा ट्रेलर लाँच

मुंबई | मराठा क्रांती मोर्चाचं वादळ महाराष्ट्रभर घोंघावल्यानंतर आता या वादळानं सिनेसृष्टीवरही धडक दिली आहे. ‘एक मराठा, लाख मराठा’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आलाय.

सध्या यूट्यूबवर हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. मिलिंद गुणाजी, भारत गणेशपुरे, किशोर कदम, मोहन जोशी, विद्याधर जोशी, अरुण नलावडे, नागेश भोसले, विजय पाटकर, प्रिया बेर्डे, सुरेखा कुडची, उषा नाईक, सुरेश विश्वकर्मा अशी सगळी नावाजलेली नावं या सिनेमात आहेत.

याशिवाय खासदार छत्रपती संभाजीराजे यांचीही या सिनेमात भूमिका असल्याचं दिसतंय.