महाराष्ट्र मुंबई

“मुंबई आमची आहे, मुंबईच्या वाट्याला जाऊ नका”

मुंबई | आम्ही मुंबईचे महत्त्व कदापिही कमी होऊ देणार नाही. मोदी सरकारचा हेतू यशस्वी होऊ देणार नाही. मुंबई आमची आहे, मुंबईच्या वाट्याला जाऊ नका, असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी दिलाय.

काँग्रेसतर्फे चेंबूर येथे सोमवारी ‘स्वाक्षरी अभियान’ राबवण्यात आलं. यावेळी बोलताना एकनाथ गायकवाड यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

मोदी सरकार हे झोलझाल सरकार आहे. त्यांनी जे निर्णय घेतले ते फक्त उद्योगपतींच्या फायद्याचेच आहेत. त्यांच्या नव्या कायद्यांमुळे शेतकरी आणि कामगार वर्ग उद्ध्वस्त होणार आहे, असं एकनाथ गायकवाड म्हणालेत.

दरम्यान, केंद्राच्या कायद्यांविरोधात मुंबईतील प्रत्येक विभागातून पाच लाख सह्या, अशा तीस लाख सह्यांचे निवेदन मोदी सरकारला पाठवणार असल्याचंही एकनाथ गायकवाड यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

‘सतर्कतेने दिवाळीचं स्वागत करा’; इकबाल सिंह चहल यांचं मुंबईकरांना आवाहन

“बिहारच्या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांचा आणि आमदारांचा पगार कापेन”

…तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन- चंद्रकांत पाटील

‘आता तुम्हीच मार्ग काढा’; मराठा आंदोलक शरद पवारांची घेणार भेट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी आहे- राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या