“गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा, 2-4 भाजप नेत्यांना तुरूंगात पाठवा”
जळगाव | गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांना वेग आला आहे. एकापाठोपाठ एक महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) अनेक मंत्री व नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आले. या कारवायांवरून राज्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर रोज धाडी पडत आहेत. आपले दोन नेते तुरूंगात गेले आहेत. किमान आता तरी गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा. 2-4 भाजप नेत्यांना तुरूंगात पाठवा, असं वक्तव्य एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं आहे.
जळगावातील एका सभेत बोलताना खडसेंनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) देखील ताशेरे ओढले आहेत. जे एकेकाळी माझे पाय धरायचे. माझा आशिर्वाद घ्यायचे, तेच आज माझ्याविरोधात आणि शरद पवारांविरोधात बोलत आहेत, अशी टीका खडसेंनी केली आहे.
दरम्यान, एकनाथ खडसेंनी हे मोठं वक्तव्य केलं त्यावेळेस व्यासपीठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित होते. खडसेंच्या या वक्तव्यानंतर भाजप (BJP) यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा
संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना थेट इशारा, म्हणाले…
“असे हे किरीट सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार?”
Raj Thackeray| पुणे दौऱ्यापूर्वी राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय
पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर
Comments are closed.