Top News

भाजप नेते एकनाथ खडसेंबाबत बाळासाहेब थोरातांचा खळबळजनक दावा

एकनाथ खडसे

नाशिक | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळं त्यांच्याच पक्षातील एकनाथ खडसेंसारखे नेते दु:खी आहेत. हेच दु:खी नेते लवकरच आमच्याकडे येतील, असा विश्वास थोरातांनी व्यक्त केला.

भाजप हा राजकीय पक्ष नसून सत्तेची भूक असलेला बकासूर आहे. त्यांची भूक भागत नाही, असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी भाजपवर तोफ डागली.

दरम्यान, काँग्रेसमधून लोकं बाहेर पडतात ही गोष्ट खरी आहे. पण नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल आणि यातूनच काँग्रेसला पालवी फुटेल, असं थोरात म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-आत्तापर्यंत 20 जणांचा पवारांना रामराम तर ‘हे’ 9 जण सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत!

-खरं बोललो तर जीवाला धोका- राजू शेट्टी

-‘या’ महत्वाच्या प्रश्नासाठी शरद पवार आणि प्रियांका गांधी पंढरपुरमध्ये एकाच मंचावर!

-‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचा पुतण्या धनुष्यबाण उचलण्याच्या तयारीत?

-ईडी, आयकर विभाग मोदींच्या तालावार नाचतात- राजू शेट्टी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या