एकनाथ खडसेंचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले…
मुंबई | भाजपची (BJP) साथ सोडून राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील संघर्ष वेळोवेळी समोर आला आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर अनेकदा बोचरी टीका केली.
एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर निशाणा साधत आणखी एकदा गंभीर आरोप केले आहेत. तर आज गोपीनाथ मुंडे असते तर त्यांनी राज्यातील राजकीय स्थिती बदलली असती. राज्याच्या राजकारणात गेले 5-7 वर्षांत जे अनुभवलं ते अनुभवलं नसतं, अशी खंत एकनाथ खडसेंनी यावेळी बोलून दाखवली.
माझ्या चौकशा करणे, बदनामीचा प्रयत्न करणे, अंडरवर्ल्ड डॉनशी माझे संबंध जोडणे, मी भूखंडात गैरव्यवहार केला असे खोटे आरोप करणे अशा नाना प्रकारे वारंवार मला छळण्याचे प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादानेच झाले आहेत, असा गंभीर आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे.
दरम्यान, जेव्हा फडणवीस विधीमंडळात पाचव्या टेबलावर बसायचे तेव्हा मीच त्यांना माझ्या मागच्या टेबलावर बसायला मदत केली होती. त्यांना वारंवार बोलण्याची संधी दिली. त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी सर्वांचा नकार होता. मात्र गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहास्तव मी त्यांना परवानगी दिली, असंही एकनाथ खडसे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
पुतिन यांना जोर का झटका! अमेरिकेसह जी-7 देशांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मोठी बातमी! नवनीत राणांचा जामीन रद्द होणार?
कच्च्या तेलाच्या दरात वाढ, वाचा तुमच्या जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
IPS कृष्णप्रकाश यांची संपत्ती आली समोर, वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे
“…तर मी 14 दिवसच काय, 14 वर्षे देखील तुरुंगात राहण्यास तयार”
Comments are closed.