बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या भूमिपूजनात एकनाथ शिंदेंना डावललं; भाजप नेत्याचं प्रश्नचिन्ह!

मुंबई | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन जुन्या महापौर निवासस्थानी पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांची उपस्थिती असणार आहे. इतरांना हा कार्यक्रम ऑनलाईन पाहता येणार आहे.

ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाला मंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रण दिलं नाही का? असा प्रश्न नितेश राणेंनी विचारत निमंत्रण पत्रिकेचा फोटो शेअर केला आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, सचिव सुभाष देसाई, MMRDA प्राधिकरण, आभा लांबा वास्तूविशारद आणि कंत्राटदार टाटा प्रोजेक्ट्स यांची नावं लिहिण्यात आली आहेत. मात्र, MMRDA ची जबाबदारी असणारे मंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं निमंत्रण देण्यात आलं नाही, यावरून भाजपने सरकारवर निशाणा साधला आहे. तर भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आज बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते. बाळासाहेब मनाचा राजा माणूस! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं, त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून शिवसेनेला टोला लगावला आहे. स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत हीच मराठी माणसाची भावना आहे. बाकी भूमिपूजन कोण करतंय महत्वाचं नाही, असं सांगत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या – 

शरद पवारांवर शस्त्रक्रिया; राणे पिता-पूत्रांनी गाठलं ब्रीच कँडी रुग्णालय

मित्राच्या गर्लफ्रेंडला घरी बोलावून दारु पाजली, त्यानंतर केला बलात्कार!

शस्त्रक्रियेनंतर शरद पवार ठणठणीत, फोटो ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या…

राष्ट्रवादीविरोधात केलेली बंडखोरी भोवली, ‘या नेत्याची शिवसेनेतून हकालपट्टी

सिनेमात सेक्स दाखण्यापेक्षा पॉर्न फिल्मच बनवा- गोविंदा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More