नाशिक | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी ठाकरे सरकारचे अनेक निर्णय रद्द केल्याने देखील ते चर्चेत आले होते. ते सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सोमवारी ते नाशिक(Nashik) जिल्ह्यातील मालेगाव येथे सभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी एक किस्सा सांगितला, तो किस्सा सगळीकडे चांगलाच व्हायरल होत आहे.
मी मुख्यमंत्री झालो असलो, तरी माझ्यातील कार्यकरता कधीच मरणार नाही. केवळ फाईल्सवर सही करणे, आदेश देणे हे मला जमणार नाही. आपण डायरेक्ट फोन उचलून काम करण्याचे आदेश देतो, तसेच आपल्या कामाची पद्धत किती झटपट आहे हे सांगताना शिंदेंनी एक किस्सा आवर्जून सांगितला, त्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.
माझ्या ओळखीच्या व्यक्तीवर मुंबईतील लिलावती रूग्णालयात उपचार सुरू होते, परंतु काही कारणाने त्या व्यक्तीचा रिपोर्ट द्यायला उशिर झाला. याची माहिती मला मिळाली तेव्हा मी विमानात बसलो होतो, तेव्हा मी रूग्णालयातील अधिकाऱ्याला फोन लावत होतो, परंतु फोन लागत नव्हता, मग मी वैमानिकाला म्हणलं पाच मिनि़ट थांब, मला एक महत्वाचा फोन लावायचा आहे, मग मी फोन केला आणि काम झालं, असं शिंदे म्हणाले.
सरकार हे जनतेला न्याय देण्यासाठी असावे. सरकारसाठी लोक नसावीत,लोकांसाठी सरकार असावे, असेही शिंदे यावेळी म्हणालेत. पण हा किस्सा सांगताना विमान नेमकं हवेत होतं की जमीनीवर होतं हे त्यांनी स्पष्ट सांगितलं नाही, त्यामुळे त्यांची सोशल मिडीयावर काहीजण मस्करी करत आहेत.
थोडक्यात बातम्या-
‘संजय राऊत आले आणि सगळं फिसकटलं’, बंडखोर आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
संजय राऊतांना न्यायालयाचा दणका, ईडी कोठडीतील मुक्काम वाढवला
‘सगळेच दिवस सारखे नसतात दिवस फिरतात, त्यामुळे…’, उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
“चाळीस ते चाळीस जागांवर निवडणुका होऊ द्या, मग बघूयात सत्ता जिंकतेय की सत्य”
“सद्यस्थितीत कोणताही पक्ष भाजपला पराभूत करू शकत नाही”
Comments are closed.