बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे पाटलांना भेटणार

कोल्हापूर | शिवसेनेत बंड करुन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाजपसोबत गेले. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री होणार असे सर्वांना वाटत होते पण झाले उलटेच. 105 आमदार असलेल्या पक्षाच्या नेत्याला दुय्यम पद मिळाले आणि 40 आमदारांच्या बंडखोर गटाला मुख्यमंत्री पद मिळाले म्हणून सर्वच अचंबित झाले.

भाजपने आपल्या नेत्याला डावलून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले यात काही काळं बेर असण्याचा सर्वांचा संशय होता. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी खुलासा करत आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली. काळजावर दगड ठेऊन आम्ही सर्वांनी पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य केला आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले, असं पाटील म्हणाले होते.

चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली. संजय राऊत (Sanjay Raut), शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेनेच्या नेत्यांनी पाटलांच्या या भाषणावर आपली प्रतिक्रिया साधून घेतली. पाटलांनी आपल्या मनातील बऱ्याच दिवसांची गरळ ओकली, असे संजय राऊत म्हणाले तर तुम्ही दगड कुठे ठेवला हा तुमचा प्रश्न आहे, असे शरद पवार म्हणाले. भाजपने आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सारवासारव केली आणि पाटलांचे वक्तव्य लपविण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीला राष्ट्रपतींच्या शपथविधी कार्यक्रमासाठी गेले आहेत. ते दुपारी तेथून थेट 2 वाजता कोल्हापूरला रवाना होणार आहेत. तिकडून ते छत्रपती संभाजी पार्क येथे चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. पाटलांच्या त्या दगडाच्या वक्तव्यानंतर ते प्रथमच शिंदे यांना भेटणार आहेत, त्यामुळे या भेटीत काय बोलणी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या आई सरस्वती बच्चू पाटील (Saraswati Bacchu Patil) (वय 91) यांचे निधन झाले आहे. त्यामुळे शिंदे त्यांची भेट घेणार आहेत.

थोडक्यात बातम्या –

‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पहिला प्रोमो आला समोर

15व्या राष्ट्रपती म्हणून दौपदी मुर्मूंनी घेतली शपथ, सर्वोच्चपदी झाल्या विराजमान

‘त्या’ भाषणावरून निलेश राणेंची शरद पवारांवर टीका, फोटो शेअर करत केला भांडाफोड

‘पक्ष पळवला आता वडील पळवत आहात, तुम्ही बंडखोर नव्हे दरोडेखोर’; उद्धव ठाकरे आक्रमक

सूड, हल्लाबोल, गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला टीझर प्रदर्शित

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More