बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबाबत अत्यंत महत्त्वाची समोर

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath shinde) यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. सततचे दौरे, कार्यक्रम, सभा यामुळे थकवा जाणवत असल्याची माहिती मिळाली आहे. डाॅक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडल्याने त्यांचे सर्व प्रशासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

गेल्या आठवड्यात शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून शिंदे यांचे सतत दिल्ली दौरेही सुरू होते. तसेच महाराष्ट्र दौरा, जाहीर सभा, बैठका, सत्कार समारंभात शिंदे व्यस्त होते. या सगळ्या धावपळीचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होऊन थकवा जाणवत आहे. डाॅक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितल्याने त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

तसेच मंत्रिमंडळ विस्तार उद्या होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसह  पाच याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने 8 ऑगस्टवर ढकलली आहे. त्यातच आता मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडल्याने मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) हे दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या दिल्ली दौऱ्याचं नेमकं कारण स्पष्ट झाले नाही. परंतु न्यायलयात गुरूवारी झालेल्या सुनावणीबद्दल आणि मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता आहे. शिंदेंनी प्रशासकीय दौरे रद्द केल्यानंतर फडणवीसांनीही आपले दौरे रद्द केले आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘मंगळसूत्र गळ्यात घातलं तर वाटतं पतीने गळाच पकडला आहे’-अमृता फडणवीस

मोठी बातमी! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर

शिंदे सरकारवर सुप्रीम कोर्टाच्या निकालाची टांगती तलवार

संजय राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ; ईडीच्या तपासात महत्त्वाची समोर

‘म्हसोबाला नाही बायको सटवायला नाही नवरा, अशी महाविकास आघाडीची अवस्था’, पडळकरांची टोलेबाजी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More