एलिवूड किपचॅगचा विश्वविक्रम, अर्धमॅरेथॉनमध्ये वेगाचा बादशाह

केनियाच्या एलिवूड किपचॅगने अर्धमॅरेथॉनमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केलाय. इटलीमधील फॉर्मुला वनच्या मोंझा ट्रॅकवर आयोजित अर्धमॅरेथॉन त्याने २ तास आणि २४ सेकंदात पूर्ण केली.

अर्धमरेथॉनचा यापूर्वीचा विश्वविक्रम केनियाच्याच डेनिस किमेत्तोच्या नावावर होता. त्याने २०१४ साली बर्लिन अर्धमॅरेथॉन २ तास, २ मिनिट आणि ५७ सेकंदात पूर्ण केली होती. एलिवूडने २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक, बीजिंग ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक तर २००४च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलंय.

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या