बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तिसऱ्या लाटेला सामोरे जायला आपण सज्ज असलो, तरी पुण्यातील निर्बंध कायम राहणार”

पुणे | सगळीकडे कोरोनाची तिसरी लाट सरु आहे. महाराष्ट्र राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या हळू-हळू कमी होत आहे. त्यामुळे आताकुठं कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अशातच पुणे जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याचा कोरोना आढावा घेत एक वक्तव्य केलं आहे. राज्यातील जिल्ह्यात करोना रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे सध्या दिलासा नाही. त्यामुळे पुणेकरांनाही दिलासा नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. आज अजित पवार यांनी पुण्यातील बाणेर येथे उभारण्यात आलेल्या नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला भेट दिली. त्याठिकाणी नव्यानं उभारण्यात आलेल्या सुविधा व साधनसामग्रीचा आढावा घेतला. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

त्यामुळे पुण्यात यापुर्वी होते तेचं निर्बंध कायम राहणार आहेत. त्यामध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 4 दुकाने सुरू राहणार असल्याचंही त्यावेळी त्यांनी सांगितलं आहे. राज्यात ऑक्सिजन प्लांट उभारले आहेच. त्यामुळे करोनाची तिसरी लाट आली तर आपण सज्ज असल्याचही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या 30-31 टक्के पाणीसाठा आहे.  त्यामुळे पाऊस पडला नाही तर पुण्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचीही शक्यता वर्तवली.

थोडक्यात बातम्या-

दहावीच्या निकालाची वेबसाईट क्रॅश; निकाल पाहण्यास विद्यार्थ्यांना अडचणी

‘महाराष्ट्राची रूग्णवाढ देशासाठी गंभीर बाब’; मोदींनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली चिंता

“काँग्रेस नेते एचके पाटील काय म्हणतात त्यालाच आम्ही महत्त्व देतो”

“यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील”

अजित पवार आणि अनिल परबांवर गुन्हा दाखल करुन CBI चौकशी करा, हायकोर्टात याचिका दाखल

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More