नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ वायरल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत असतं. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती महादेवाचं एक गाणं अगदी सुमधूर आणि संगीतबद्ध करून गाताना दिसत आहेत. या व्हिडिओचं विशेष असं की स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिट्विट करत ‘बहुत बढीया’ असं लिहून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
‘तैमूर का जिजा’ या ट्विटर अकाउंटवरून दोन व्यक्तींचा हा सुमधुर व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. नरेंद्र मोदी यांनी रिट्विट केल्यानंतर दहा लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला पाहिलं असून जवळपास दीड लाख लोकांनी त्याला पसंती दर्शवली आहे. तुणतुणं आणि डफली वाजवून या दोघांनी सर्वांचीच महाशिवरात्र संगीतमय करून टाकली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच हा व्हिडीओ रिट्विट करून कौतुकाची थाप या तरुणांना दिल्यामुळे सध्या त्यांचाच बोलबाला सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. मोदींनी शेअर केल्यानंतर या व्हिडिओला खूप जास्त प्रसिद्धी मिळाली तसेच सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
समाज माध्यमांवर अनेक चांगल्या वाईट गोष्टी पसरवल्या जातात. त्यातच स्वतः नरेंद्र मोदींनी व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे ते ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असल्याचं त्यांनी दाखवून दिलं आहे. सोशल मीडियामुळे क्षणार्धात आपला व्हिडिओ करोडो लोकांपर्यंत पोहोचवणं सहज शक्य झालं आहे. याचे काही दुष्परिणामही आहेत. पण सकारात्मकरित्या त्याचा उपयोग केल्यास ते नक्कीच फायद्याचं ठरतं.
बहुत बढ़िया! https://t.co/55ViOzefjQ
— Narendra Modi (@narendramodi) March 9, 2021
पाहा व्हिडिओ –
Comments are closed.