बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर आपण संविधानाचं एक पानही आज लिहू शकलो असतो का?”

नवी दिल्ली | आज 26 नोव्हेंबर आजचा दिवस संपूर्ण देशात संविधान दिन (Constitition Day) म्हणून साजरा केला जातो. आज सर्वत्र संविधान दिवस साजरा करून संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (dr.Babasaheb Aambedkar) यांच्या योगदानप्रती आदर व्यक्त केला जातो. संविधान दिनानिमित्त आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्येही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संविधानप्रती आपल्या भावना व्यक्त करतानाच संविधानाचं महत्त्व बोलून दाखवलं आहे.

यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आज जर आपल्याला संविधान लिहायला लागलं असतं तर काय झालं असतं? स्वातंत्र्य आंदोलनाची छाया, देशभक्तिची आग, फाळणीचं दु:ख हे सर्व असूनही त्यावेळी देशहीत सर्वोच्च हाच मंत्र होता. विविधतेनं नटलेला देश, अनेक भाषा, पंथ असं सर्व असतानाही देशाला एकाच बंधनात अडकवून ठेवणं कठीणं होतं’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना ‘आज जर मागे वळून पाहिलं तर आपण संविधानाचं एक पानतरी लिहू शकलो असतो का? असा प्रश्न पडतो,’असं म्हणाले आहेत. याशिवाय त्यांनी यावेळी एक खंत देखील व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘त्यावेळी राष्ट्र पहिलं होतं. परतुं काळानुसार राजकारणाचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे देशहित मागे पडू लागले आहे,’अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सर्व देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मोदींसह राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांनी देखील या कार्यक्रमाला संबोधित केलं. तर दुसरीकडे 14 विरोधी पक्षांनी संसदेत झालेल्या या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. काँग्रेस, समाजवादी पार्टी, डीएमके, टीएमसी यांसह इतर 14 पक्षांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचं समोर आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…तर भाजपने आता आमच्यासोबत मिळून राज्य करावं’, राऊतांची खुली ऑफर

“तुमचं नेमकं धोरण काय? कोंबड्या वाचवणं की माणसं”

दिल्लीत नेमकं शिजतंय काय?, चंद्रकांत पाटलांच्या पाठोपाठ फडणवीसही दिल्लीत

सलाम त्यांच्या कार्याला! जीव धोक्यात घालत केलं लसीकरण पूर्ण

“बहोत हो गई महंगाई की मार, अब की बार…”, भाजपला खडे बोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More