राहुल गांधींच्या ‘चौकीदार चोर है’ला नरेंद्र मोदींनी दिलं जशास तसं उत्तर!

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वेळोवेळी टीका केली आहे. यावर मोदींनी उत्तर दिलं आहे.

देशातील प्रत्येक व्यक्ती जी भ्रष्टाचाराविरुद्ध लढून देशाच्या विकासासाठी काम करत आहे ती प्रत्येक व्यक्ती चौकीदार आहे, असं म्हणत मोदींनी ‘मैं भी चौकीदार’ मोहीम सुरु केली आहे.

तुमचा चौकीदार देशाच्या सेवेसाठी दृढपणे उभा आहे. यात मी एकटा नाही, असंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

देशातील प्रत्येक व्यक्ती म्हणत आहे ‘मी पण चौकीदार’, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

गडकरींच्या आशीर्वादाने मी या निवडणुकीत विजयी होणार- नाना पटोले

-शिवसेनेच्या ‘या’ चार उमेदवारांची नावे उद्धव ठाकरेंनी केली जाहीर!

सीट मिळाल्याशिवाय मी समाधानी नाही; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर खोतकरांची प्रतिक्रिया

बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करणार नाही; विनायक मेटे यांची भूमिका

मसूद अजहरला सोडण्यास सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांचा पाठिंबा होता- शहा