इतक्या ठिकाणांवर ईव्हीएमसोबत छेडछाड, हार्दिकचा खळबळजनक आरोप

अहमदाबाद | ईव्हीएम छेडछाड प्रकरणावरुन हार्दिक पटेलनं मोठा खळबळजनक आरोप केला आहे. भाजपकडून ईव्हीएमसोबत छेडछाड सुरु असल्याचा आरोप करणाऱ्या हार्दिकने आज चक्क यादीच जाहीर केलीय.

विसनगर, पाटन, राधनपुर, टँकारा, ऊँजा, वाव, जेतपुर, राजकोट-६८, ६९, ७०, लाठी-बाबरा, छोटा उदेपुर, संतरामपुर, साँवली, मांगरोल, मोरवाहड़फ, नादोद, राजपीपला, डभोई या ठिकाणांसह पटेल आणि आदिवासींचं प्राबल्य असलेल्या ठिकाणच्या ईव्हीएमसोबत छेडछाड झाल्याचा आरोप हार्दिकने केलाय.

दरम्यान, देवाने बनवलेल्या मानवी शरीरात बदल केले जाऊ शकतात, एटीएम हॅक होऊ शकतं, तर ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकत नाही का? असा सवाल हार्दिकनं विचारलाय.