Top News

‘या’ माजी केंद्रीय राज्यमंत्र्याचा राजकीय संन्यास; फेसबुक पोस्ट करत 43 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला रामराम

नांदेड | ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. फेसबुकच्या माध्यमातून भावनिक पोस्ट लिहून सूर्यकांता पाटील यांनी आपला निर्णय जाहीर केला. 43 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी रामराम ठोकला.

43 वर्ष राजकारणात होते एखाद्या राजकुमारीसारखी राहिले. 400 रुपयांची साडी 4000 हजाराच्या थाटात नेसली, मिळालेले काम मन लावून केले, आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत आणि अश्या अनोख्या प्रांतात माझ्यासारखी मनस्वी रमू शकत नाही. राजीनामा लिहून तयार होता पण मी आहेच कोण म्हणून एवढा शो करायचा, असं त्यांनी फेसबुकवर लिहिलं आहे.

सूर्यकांता पाटील सुरुवातीला काँग्रेसमध्ये होत्या, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र भाजपमध्ये त्यांचे मन रमताना दिसत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये त्यांनी अनेक पदं भूषवली आहेत.

पाटील यांनी चार वेळा खासदार, एक वेळा आमदार म्हणून हिंगोली-नांदेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्या ग्रामविकास मंत्रालयात राज्यमंत्री होत्या. त्यानंतर संसदीय कार्य मंत्रालयाचे राज्यमंत्रीपदही त्यांनी भूषवलं होतं.

ट्रेंडिंग बातम्या-

…म्हणून 11 वर्षीय मुलीनं आपल्या आईविरोधातच दाखल केला गुन्हा

खासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन

महत्वाच्या बातम्या-

होय शेरकर माझे मित्र, नाण्याची एकच बाजू ऐकण्यापेक्षा…- अमोल कोल्हे

उद्धव ठाकरेंनंतर राहुल गांधींची आदित्य ठाकरेंशी चर्चा; मुंबईतील परिस्थितीविषयी दिला ‘हा’ सल्ला

…तर हर हर महादेव होणारच; नितेश राणेंचा थेट इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या