बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आंबेडकरी समाजावरील पोस्ट महागात, ‘या’ अभिनेत्रीला अटक होण्याची शक्यता”

मुंबई | अभिनेत्री केतकी चितळे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सर्वत्र परिचीत आहे. केतकी समाज माध्यमांवर सक्रीय असते. ती आपलं मत फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मांडत असते. मात्र अनेकदा केतकी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ट्रोल झाली आहे. केतकीला तिचं वादग्रस्त वक्तव्य चांगलंच भोवण्याची चिन्हं आहेत.

केतकीच्या जुन्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणी वाढताना दिसत आहेत. त्यामुळं केतकी आता कायदेशीर कचाट्यात सापडली आहे. केतकीला तिच्या जुन्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे. ठाणे न्यायालयाने केतकीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणं असो की, तिला कमेेंटमध्ये शिवीगाळ करणाऱ्या नेटकऱ्यांना उत्तर देणं असो, त्यामुळे केतकी सध्या चर्चेत आली आहे. त्यासोबतच  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला त्यांचे अनुयायी अभिवादनासाठी नव्हे तर दर्शनासाठी मुंबईत येतात. या त्यांच्या वक्तव्यावरून हा समाज फुकटा आहे. तसेच त्या महामानवाचा आदर करत नाहीत, हे स्पष्ट होतं, अशी पोस्ट केतकीने केली होती. 1 मार्च 2020 ला तिनं फेसबुकवर पोस्ट केली होती. यावरून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते वकील स्वप्नील जगताप यांनी केतकी विरोधात अशी तक्रार केली होती.

दरम्यान, दलित समाजाच्या भावना दुखावल्याने अॅट्रोसिटी कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असं तक्रारीमध्ये नमूद केलं होतं. जगताप यांच्या तक्रारीवरून केतकीवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आता ठाणे न्यायालयाने केतकीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

मनोहर मामाला पोलिसांनी कुठं आणि कसं पकडलं?, मोठी माहिती समोर

बाबो! रिलेशनमध्ये येताना महिलेनं 17 पानी काॅन्ट्रॅक्ट लेटर करत केल्या ‘या’ रोमँटिक मागण्या!

…म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी दिला राजीनामा, राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण!

साकीनाकाच्या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया म्हणाले…

‘या घटनेवर राजकारण करणं म्हणजे मृत्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं’; संजय राऊत विरोधकांवर संतापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More