फेसबुकची घोडचूक, कर्मचाऱ्यांची माहिती दहशतवाद्यांकडे लीक

मुंबई | फेसबुककडून आपल्याच कर्मचाऱ्यांची माहिती संशयित दहशतवाद्यांना लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. २२ विभागातील १ हजार कर्मचाऱ्यांची माहिती लीक झाल्याचं कळतंय.

ज्या कर्मचाऱ्यांची माहिती लीक झाली, ते सर्व दहशतवादी आणि अश्लील पोस्ट डिलीट करण्याचं तसेच असे प्रोफाईल बंद करण्याचं काम करत होते.

फेसबुकमध्ये असलेल्या बिघाडामुळे ज्यांची अकाऊंट बॅन केली जात होती, त्यांना संबंधित कर्मचाऱ्याची माहिती मिळत होती. त्यामुळे एका कर्मचाऱ्याने फेसबुकला रामराम ठोकलाय.

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या