बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फडणवीस म्हणाले होते, विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही, त्याचं काय झालं?”

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यापासून राज्यातील वातावरण तापलं आहे. ओबीसींना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजपने चक्क जाम आंदोलन केलं होतं. त्यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जर तीन महिन्यांमध्ये आरक्षण मिळवून दिलं नाहीतर राजकीय सन्यास घेईल, असं वक्तव्य केलं होतं. यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही यावरून फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं तुम्ही फार गांभीर्याने घेतलं आहे. ते म्हणाले होते स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही. परंतू त्यानंतर काय झालं आपण पाहिलं आहे. त्यामुळे त्यांच्या घोषणा गांभिर्यानं घ्यायची गरज नसल्याचं म्हणत थोरातांनी फडणवीसांना चांगलंच फटकारलं आहे.

आज मुंबईमध्ये थोरात यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस धनगर आरक्षण सोडवू असं म्हणाले होते. त्यानंतर आता ओबीसी आरक्षण दिलं नाही तर संन्यास घेईन म्हणतात, मात्र यापैकी काहीही झालं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सत्तेसाठी काहीही बोलायचं, नंतर कृती करायची नाही, हा भाजपचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. जनमाणसाला फसवणं आणि सत्ता मिळवणं हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात, असं म्हणत थोरांतांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पुणे विभागात 679 कोटींची थकबाकी; महावितरणकडून वीज बिल वसुलीच्या सूचना

“मराठा समाजाला हलक्यात घेऊ नका, चिंगारीचा वणवा पेटण्याआधी जागे व्हा”

देवेंद्र फडणवीस लढवय्ये नेते, महाराष्ट्राला त्यांची गरज, त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे- संजय राऊत

बंदी असतानाही फिरायला जाणं पडलं महागात; लोणावळ्यात 900 पर्यटकांकडून ‘इतक्या’ लाखांचा दंड वसूल

“सर्वकाही सुरळीत आणि मनाप्रमाणे होईल, पण देवेंद्र फडणवीस संन्यास घेऊ नका”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More