मुंबई | एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी पहिलाच मोठा निर्णय घेतला. मेट्रो कारशेड हे आरेचे जंगल तोडूनच होईल अशी कार्यवाही त्यांनी सुरु केली. याला महाविकास आघाडी सरकारने विरोध केला आहे. त्याविरोधात आता पर्यावरणप्रेमी आणि रक्षक यांनी आंदोलने सुरु केली आहेत.
मेट्रो कारशेडचे आरे येथील काम वर्षभरात पुर्ण होईल आणि मुंंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कामही वेगाने सुरु होईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच आरेसाठी आंदोलन करणारे खोटे पर्यावरणप्रेमी आहेत, असा आरोप त्यांनी केला. कारशेड आरेसोडून कांजुरमार्ग येथे जर स्थलांतरीत केले तर खर्चात प्रचंड वाढ होऊन नाकापेक्षा मोती जड अशी अवस्था होईल, असे फडणवीस म्हणाले.
आरे शेडचे 25% काम आमच्या सरकारने पुर्ण केले होते आणि आरेची जागा राखीव वनक्षेत्रात मोडत नाही. कारशेडचे काम पुर्ण होईपर्यंत मेट्रो प्रकल्प सुरु होऊ शकत नाही. कारशेडसाठी अगोदरच विलंब झाल्याने प्रकल्प खर्चात सुमारे 10 हजार कोटींची वाढ झाली असून जर हा प्रकल्प कांजुरमार्गला गेला तर काम पुर्ण होण्यासाठी अजून चार वर्षे लागतील. आणि या प्रकल्पाच्या खर्चात 20 – 25 कोटी रुपयांची वाढ होईल, असंही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीचे नेते आणि स्वत: आदित्य ठाकरे यांनी याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. आरे येथे अनेक पर्यावरणप्रेमी आणि पर्यावरणरक्षक आंदोलन करत आहेत. एकंदर परिस्थिती बघता आरेभोवती आता पोलीस बंदोबस्त देखील वाढविण्यात आला आहे.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! बहुमतापेक्षा जास्त मतं मिळवत शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला
‘छमिया नाच रे’, सेहवागची विराट कोहलीवर खालच्या भाषेत टीका
अमरावती हत्याकांडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मोठी बातमी ! बहुमत चाचणीपूर्वी शिवसेनेला आणखी एक झटका
‘घटनेचे रखवालदार म्हणवून घेणारेच असे दुटप्पीपणे वागत असतील तर…’, शिवसेनेचा घणाघात
Comments are closed.