Top News खेळ महाराष्ट्र मुंबई

अर्जुन तेंडुलकरला ट्रोल करणाऱ्यांना फरहान अख्तरनं सुनावलं; म्हणाला….

Photo Credit - Twitter/ @father_of_BJP/ Arjun Tendulkar Facebook /Farhan Akhtar

मुंबई | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या 14व्या हंगामात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा पहिल्यांदाच आयपीएल लिलावात सामील होणार असल्याने क्रिकेट रसिकांच्या त्याच्या लिलावाकडे लक्ष लागलं होतं. त्याच्या निवडीनंतर अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली. त्यानंतर अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर याने ट्रोलर्सला सुनावलं आहे.

मला असं वाटतं की मला अर्जुन तेंडुलकरच्या बाबतीत हे सांगायला हवं. आम्ही एकाच जिममध्ये जातो आणि तो त्या ठिकाणी फिटनेससाठी किती मेहनत घेतो हे मी पाहिलं आहे. त्याचं ध्येय उत्तम क्रिकेटर बनण्याचं आहे. त्याच्यावर नेपोटिझम सारखा शब्द लादणं चुकीचं आणि क्रुर आहे, त्याचा उत्साह सुरू होण्यापूर्वीच त्याच्या उत्साहाचा खून करू नका, असं म्हणत फरहान अख्तरनं ट्विटरच्या माध्यमातून ट्रोलर्सना चांगलचं सुनावलं आहे.

अनकॅप खेळाडूंमध्ये अर्जुनचं नाव न आल्यानं सर्व बुचकळ्यात पडले होते. परंतु मुंबई इंडियन्सनं त्याला शॉर्ट लिस्ट करून अखेरच्या फेरीसाठी राखून ठेवले आणि लिलावातील शेवटचं नाव हे अर्जुनचं होतं. मुंबई इंडियन्स या एकमेव संघानं त्याच्यासाठी बोली लावली.

दरम्यान, काही अपरिचित खेळाडूंना या लिलावात चांगली रक्कम मिळाली. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयांच्या आधारभूत किमतीत विकत घेतले.

थोडक्यात बातम्या – 

“मोदी सरकार जनतेचे खिसे रिकामे करुन त्यांच्या मित्रांना मोफत देण्याचं काम करत आहे “

‘आमच्या जिल्हयात सामना येतचं नाही’; पडळकरांचा शिवसेनेवर हल्लाबोल

बॅंकेत कर्मचारी सांगून केलं लग्न पण डोळ्याअंधारी करायचा ‘हे’ उद्योग

‘कृष्णकुंजवर न्याय मिळतो’; मावळवासियांकडून राज ठाकरेंचे आभार

पेट्रोल-डिझेल दर वाढीबाबत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला मोठा खुलासा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या