Top News देश

खळबळजनक! चार शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट; शुटरची जाहीर कबुली

नवी दिल्ली |  केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन चालू आहे. मात्र आंदोलनाबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे. चार शेतकऱ्यांची हत्या करण्याचा कट रचला असल्याची माहिती शूटरने दिली आहे.

शेतकऱ्यांनी रात्री चेहरा झाकलेल्या व्यक्तीला माध्यमांसमोर उभं केलं. त्यानंतर या व्यक्तीनं चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्याचा कट केला असल्याचं सांगितलं आहे.

26 तारखेला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये गोळ्या झाडून वातावरण खराब करायचे होते. याचबरोबर 23 ते 26 जानेवारीदरम्यान शेतकरी नेत्यांवर गोळ्या झाडायच्या होत्या असं शुटरने सांगितलं आहे.

दरम्यान, या कटात माझ्यासोबत काही महिलाही आहेत. या महिलांचं काम आंदोलकांना भडकविण्याचं होतं. या शुटरने जाट आंदोलनातही गोंधळ घालण्याचं काम केल्याचं कबूल केलं आहे. शुटरने केलेल्या दाव्यामुळे आता शेतकरी आंदोलन आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

 

थोडक्यात बातम्या-

शाळा सुरु होण्याची तारिख बदलली; आता ‘या’ तारखेला भरणार वर्ग!

“…तर पवार साहेब ‘सीरम’मध्ये वशिला लावतील”

‘बर्ड फ्लूमुळे माणसाचा मृत्यु दाखवा अन्…’; बर्ड फ्लूच्या अफवा रोखण्यासाठी दुग्धविकास मंत्र्यांची आयडियाची क्लपन

आघाडीत बिघाडी करायची नाही त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही- अशोक चव्हाण

धक्कादायक! गावकऱ्यांनी जळता टायर कानावर फेकत हत्तीला पेटवलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या