बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाप बापच असतो… बिबट्याच्या जबड्यातून केली मुलाची सुटका

मुंबई | मुंबईतील आरे काॅलनीत गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची भिती वाढली आहे. आपल्या शिकारासाठी बिबट्या अनेक वेळ्या मानवी वस्तीत शिरला होता. त्यामुळे लोक देखील सायंकाळी बाहेर पडत नव्हते. अशातच एका मुलावर बिबट्याने हल्ला केला. मात्र त्याच्या वडिलांनी मोठं धाडस दाखवलं आहे.

ही घटना 18 सप्टेंबर रोजी घडली आहे. आरे काॅलनीतील 8 वर्षाचा मुलगा दुकानातून घरी परतत होता. यावेळी बिबट्याने मुलावर हल्ला केला. संबंधित मुलाचं नाव रोहित असं आहे. रोहितला बिबट्याने जबड्यात पकडलं. त्यानंतर रोहितने आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली.

मुलाचा आवाज ऐकून रोहितच्या वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता त्याच्याकडे धाव घेतली. तिथं पोहचताच रोहितच्या वडिलांनी बिबट्याच्या चेहऱ्यावर टाॅर्च मारली. टाॅर्चच्या उजेडाने बिबट्याने घाबरुन रोहितला सोडलं आणि तिथून पळ काढला.

दरम्यान, बिबट्याने रोहितचा पाय आपल्या जबड्यात पकडला होता. त्यामुळे रोहितच्या पायावर तीन ठिकाणी दुखापत झाली आहे. मात्र या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. तसेच सर्वत्र रोहितच्या वडिलांचं कौतुक देखील केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“शिवसेना आणि आमचं फेव्हिकॉलचं नातं, दिवार तुटणार नाही”

कर बुडवल्याच्या आरोपावर सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

“कायद्याची लढाई कायद्यानं लढा कोल्हापूरी चपलेनं लढू नका”

‘येत्या दोन दिवसात…’; चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक दावा

“सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा मुख्यमंत्री कार्यालयाशी काडीचाही संबंध नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More