वडिलांना ‘टकला’ म्हणणं मुलीला पडलं महागात; सावत्र बापाने केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य
भोपाळ | मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील नागदा येथे दोन दिवसांपूर्वी एका तरुणीची हत्या झाली होती. याप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. सावत्र वडिलांनी त्या मुलीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
दोघांमध्ये सतत वाद होत होते. अशात दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं. भांडणादरम्यान तरुणी वडिलांना टकला म्हणाली. मात्र यावरून नाराज झालेल्या वडिलांनी वीट डोक्यात मारुन मुलीची हत्या केली आहे.
सावत्र वडील मानसिंह गुर्जर यानंच सोनालीच्या असभ्य वागण्यामुळे तिची हत्या केली. घटनेच्या दिवशी आरोपी मानसिंह सकाळी आपल्या पत्नीली भाजीपाल्याच्या दुकानात सोडून पाणी भरण्यासाठी परत आला. याचदरम्यान सोनालीनं त्याला अपशब्द वापरला. याच कारणामुळे मानसिंहला आपला राग अनावर झाला आणि त्यानं सोनालीच्या डोक्यावर वारंवार वीटेनं वार केले. यातच तिचा मृत्यू झाला, असं सीएसपी मनोज रत्नाकर यांनी सांगितलं आहे.
नागदा येथील जुन्या बस स्टॅण्ड गोल्डन लॉजमध्ये झालेल्या हत्येच्या पुरव्यांआधारे पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. तसेच या प्रकरणात आधीपासून घरातील व्यक्तीचा हात असल्याचं समोर आलं होतं.
थोडक्यात बातम्या-
पोलीस असल्याचं सांगून ठेवले शारीरिक संबंध, चौकशी केल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार
रेखा जरे हत्याकांड प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय, आरोपी मुदतीत हजर न झाल्यास…
गुडन्यूज, कोरोनाचं टेंशन कायमचं जाण्याची शक्यता; शास्त्रज्ञांनी लावला ‘हा’ महत्त्वाचा शोध
धक्कादायक!; चार मित्रांकडून मुलीवर बलात्कार, व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकला
प्रेमप्रकरणातून ती चार जणांसोबत पळाली; कुणासोबत लग्न करु?, असा प्रश्न पडल्यानंतर घडला विचित्र प्रकार
Comments are closed.