मुंबई | शिवसेनेची बीकेसी मैदानामध्ये विराट सभा होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही पहिलीच राजकीय सभा आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना भाजपवर जोरदार टीका केली आहे.
गदाधारी हिंदूत्व आमचं आहे. संपुर्ण जगामध्ये फक्त भारतीय जनता पक्षचं हिंदूत्ववादी आहे, असं दाखवलं आहे. मला देवेंद्र फडणवीसांनी विचारायचं आहे की, स्वातंत्र्य लढ्यापुर्वी संघ अस्तित्वात होता. संघ एकदाही स्वातंत्र्यलढ्यात उतरलेला नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
ही बाळासाहेबांची शिवसेना नसेल तर तुमचा भाजप तरी अटल बिहारींचा राहिलेला आहे का?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
थोडक्यात बातम्या-
“उद्धवजींचं नाव घेतल्याशिवाय या बबली बंटीला प्रसिद्धी मिळत नाही”
केतकी चितळेच्या पोस्टवर राज ठाकरे संतापले, म्हणाले…
रूपाली ठोंबरे आक्रमक, केतकी चितळेला दिला गंभीर इशारा
‘लाजा वाटल्या पाहिजेत’; केतकीच्या पोस्टवर छगन भुजबळ भडकले
“भगवे वस्त्र चढवून हातात हनुमानाची मुर्ती घेतली म्हणजे काही…”
Comments are closed.