बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर मुहूर्त ठरला ! काॅलेज सुरू करण्याबाबत उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य

मुंबई | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून शिक्षणाचा खेळ खंडोबा झाल्याचं चित्र आहे. शाळा , महाविद्यालये बंद असल्यानं ऑनलाईन शिकवण्या घेण्यात येत आहे. कोरोना आटोक्यात आल्यानं महाविद्यालये पुन्हा सुरू होतील अशी अपेक्षा होती. मात्र, डेल्टा प्लस व्हारियंटमुळे राज्यात पुन्हा निर्बंध लावण्यात आले होते. त्यातच आता राज्य उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे.

उद्य सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत मोठी घोषणा केली. येत्या 1 नोव्हेंबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा विचार आहे, अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे. तर 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत सीईटीच्या परीक्षा होणार असल्याचं देखील सामंत यांनी यावेळी सांगितलं.

सीईटी परीक्षा झाल्यानंतर लवकरच त्याचा निकाल लावल्यानंतर तात्काळ काॅलेज सुरू करण्यात येतील, असंही उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेवेळी सांगितलं आहे. कोरोनाची परिस्थिती काय असेल त्यावर देखील महाविद्यालये सुरू करावी की नाही हे ठरणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.

दरम्यान, सीईटीसाठी यंदा 8 लाख, 55 हजार 869 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तर 198 केंद्रावर ही सीईटीची परीक्षा होणार असल्याचं देखील सामंत यांनी यावेळी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“सिद्धार्थच्या गाडीच्या काचा फुटलेल्या होत्या, त्याच्या मृत्युमागचं खरं कारण कळू द्या”

अंधश्रद्धेचा कळस! पावसासाठी मुलींना निर्वस्त्र करुन त्यांच्यासोबत केलं धक्कादायक कृत्य

‘मोहन भागवतांनी माझ्या ज्ञानात भर घातली’; भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून पवारांचा टोला

मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ सहा जिल्ह्यांना अलर्ट जारी

बिकिनी घालून महिला पोहोचली विमानतळावर; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More