बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयुषमानच्या आगामी चित्रपटातील फर्स्ट लूक व्हायरल, पाहा फोटो!

मुुंबई | अभिनेता आयुषमान खुराना आपल्या अभिनयामुळं नेहमी चर्चेत असलेला पाहायला मिळतो. वेगवेगळ्या भूमिका साकारत त्यानं प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं असं स्थान बनवलं आहे. अशातच आता आयुषमान त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या आगामी चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला आहे. त्याचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडताना दिसत आहे.

आयुषमानच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘डाॅक्टर जी’ असून त्याच्या सोबत अभिनेत्री रकुलप्रीत सिंह मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटातील आयुषमानचा फर्स्ट लूक रिलीज झाला असून सध्या सोशल मीडियावर आयुषमानच्या या फर्स्ट लूकचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या चित्रपटात आयुषमान पहिल्यांदाच रकुलप्रीत सोबत स्कीन शेअर करणार आहे.

या चित्रपटाविषयी बोलताना आयुषमाननं म्हटलं की, डाॅक्टरची भूमिका साकारणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. या भूमिकेतून मला विद्यार्थी बनण्याची आणि होस्टेल लाईफ जगण्याची पून्हा एकदा संधी मिळत आहे. त्याचबरोबर ही भूमिका साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.

दरम्यान, आयुषमाननं ट्विटरवर फोटो शेअर केला आहे. लाॅकडाऊनमुळं या चित्रपटाचं चित्रीकरण लांबणीवर पडलं होतं. मात्र, आता कोरोनाचे सर्व नियम पाळत या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होणार आहे. आयुषमानचे चाहते त्याच्या नवीन चित्रपटासाठी खूप उत्सुक असलेले पाहायला मिळत आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वाचला आजोबांचा जीव; थरारक व्हिडीओ व्हायरल

‘लस घ्या आणि बाहुबली व्हा’; नरेंद्र मोदींचं जनतेला आवाहन

“तुम्ही आमच्या फोनमध्ये काय वाचता हे आम्हाला माहितीये”

मुख्यमत्र्यांना हात जोडून विनंती करतो, की पांडुरंगाच्या महापूजेला येऊ नका- बंडातात्या कराडकर

“बकरी ईदनिमित्त कोरोना नियमांमध्ये दिलेल्या सवलती मागे घ्या, अन्यथा…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More