बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून या जोडप्यानं नव्या शेजाऱ्यांना वाटली चक्क मोफत बीअर!

नवी दिल्ली | घर बदल्यानंतर लोक शेजाऱ्यांची ओळख करुन घेण्यासाठी त्यांना गोड पदार्थ घेऊन जातात. तर अनेक जण चहाला बोलवतात आणि शेजाऱ्यांसोबत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करतात. मात्र फ्लोरिडा येथे एका जोडप्याने नवीन घर घेतल्यानंतर तेथील शेजाऱ्यांसोबत ओळख करुन घेण्यासाठी अजब मार्ग अवलंबला आहे.

अमांडा आणि थाॅमस इव्हान्स असं या जोडप्याचं नाव असून कोरोना सुरु होण्याच्या आधी घर बदलण्याचं ठरवलं होतं. फोर्ट मेयर्स येथे राहणाऱ्या या जोडप्याने कोरोना काळात केप कोरळ येथे स्थलांतर केलं. त्यानंतर तेथील शेजाऱ्यांसोबत ओळख करुन घेण्यासाठी या जोडप्याने त्यांना मोफत बिअर बाॅटल वाटल्या आहेत.

अमांडा हीने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे सध्या वातावरण इतकं वेगळं आहे की लोकांना नेमकं काय वाटतं याची त्यांना खात्री नव्हती. त्यामुळे त्यांनी घराबाहेर एक बॅनर लावला. त्या बॅनरवर त्यांनी तेथे नवीन असून त्यांना तिथल्या लोकांसोबत ओळख करुन घ्यायची आहे. तसेचं त्यांच्या शेजारच्यांना भेटायची त्यांना खुप इच्छा आहे आणि त्यासाठी ते वरांडामध्ये बिअर घेऊन थांबत असल्याचं त्यांनी त्या बॅनरवर लिहिलं होतं.

दरम्यान, कोठेही मोफत बिअरची पाटी पाहून लोकांनी आकर्षित होणं हे फार गमतीदार आहे, असं मुलाखतीदरम्यान थाॅमस म्हणाले. मोफत बिअर ठेऊन लोकांना मैत्रीसाठी बोलावणं हा सोपा मार्ग आहे, असं देखील थाॅमस यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

दीदी, हवं तर मला लाथा मारा पण…- पंतप्रधान नरेंद्र मोदी

“चार कोंबड्या, दोन कावळे मेले तरी केंद्र सरकार महाराष्ट्रात सीबीआय आणि एनआयएला पाठवेल”

शरद पवारांनी उदाहरण दिलेले ‘ज्युलिओ रिबेरो’ आहेत तरी कोण?

“काँग्रेसनं महाराष्ट्र सरकारमधील पाठिंबा काढून घ्यायला हवा”

“बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल, हा इशारा नसून वस्तुस्थिती”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More