बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुम्ही भारताची जी निंदा करताय त्यानं मला रडू येतंय’; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूचं भारत प्रेम

नवी दिल्ली | ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि भारतीय खेळाडू यांच्यात नेहमीच सलोख्याचे संबंध आहेत. कोरोनामुळे जागतिक स्तरावर भारतीय नेतृत्वावर टीका केली जात आहे. अनेक जागतिक वृत्तपत्र भारतातील वाढत्या कोरोनामुळे केंद्र सरकारवर सवाल उपस्थित करत आहेत. तुम्ही भारताची जी निंदा करताय त्यानं मला रडू येतंय, असं ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन याने म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यानं जगभरातील माध्यमांना खडसावलं आहे.

भारतात मी जिथंही गेलो तिथे लोकांनी मला खूप प्रेम दिलं, त्यासाठी मी नेहमीच त्यांचा ऋणी राहील. मी मोठ्या अभिमानाने सांगू शकतो की गेल्या काही वर्षात मी भारत अगदी जवळून पाहिला आहे. यावेळी देश केवळ संकटात आहे म्हणून नाही तर माध्यमं सध्या भारताविषयी जे चित्र सांगतायत त्याने मला रडू येतंय. माध्यमांपैकी थोड्याच जणांनी या देशाच्या समस्या समजून घेतल्या असाव्यात, असं मॅथ्यू हेडन म्हणाला.

पाठीमागच्या एका दशकापासून मी भारतात जातोय. भारतातल्या अनेक भागांत फिरलोय, खासकरुन तामिळनाडू राज्याला मी माझं आध्यात्मिक घर मानतो. इतका विविधतेने नटलेला आणि विशाल देशाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांबद्दल माझ्या मनात नेहमीच सर्वोच्च सन्मान राहिला आहे, असं देखील हेडन म्हणाला.

दरम्यान, तुमच्या सहवेदना आणि भावनांबद्दल आभारी आहे, असं भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे. हेडनने घेतलेल्या भूमिकेचं त्यांनी कौतुक केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“अजित पवारांनी कोवॅक्सिन लस निर्मितीचा प्रकल्प राजकीय वजन वापरून पुण्याला पळवला”

कोविशिल्ड लस घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; आरोग्य मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

कोरोनातून बरे झालेल्या लहान मुलांना ‘या’ नव्या आजाराचा धोका, नागपूरमध्ये रुग्ण वाढले

जोर लगाके हैशा! लोकं बघत राहिली पण युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी करून दाखवलं

नव्या फीचर्ससह शाओमी ‘हा’ लोकप्रिय स्मार्टफोन रिलाँच करणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More