बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जम्मू काश्मीरमध्ये नागरिकांना सध्या असुरक्षित वाटतंय”

नवी दिल्ली | केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. जम्मू-काश्मीरमधील त्यानंतर अनेक नेत्यांना नजरकैदमध्ये ठेवण्यात आलं होतं. अलिकडेच जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मु्क्ती यांनी केंद्र सरकारने मला नजर कैद ठेवल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही आता जम्मू-काश्मीरच्या बद्दल वक्तव्य केलं आहे.

सध्या काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद्या कारवाया होत आहेत. त्यामुळे तेथील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यांना या ठिकाणी असुरक्षित वाटू लागले आहेत. प्रशासनाचे या राज्यात सर्वांसाठी सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. दहशतवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत यावर्षी 28 नागरिकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे, असं उमर अब्दुल्ला यांनी सांगितलं आहे.

गेल्या काही दिवसात काश्मिरी पंडित आणि शिख समुहावर हल्ले करण्यात आले आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांच्या वाढणाऱ्या कारवायावरून या नागरिकांचं पालायन करू नये. खरं तर याठिकाणी कोणीच सुरक्षित राहिलेला नाही आहे, असं ओमर अब्दुल्ला म्हणाले आहे.

दरम्यान, अलिकडेच जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यामध्ये अनेक नागरिक तसेच भारतीय सैनिक शहिद झाले आहेत. त्यामुळे सध्या जम्मू काश्मीर मधील परिस्थिती खुप भयानक झाली आहे. त्यामुळे उमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘मी एकट्याने पाप केलं असेल तर…’; माफी मागत राष्ट्रवादीचे आमदार ढसाढसा रडले

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

शिवसेना देशातील दुसरा सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष; ‘या’ माध्यमातून मिळाले कोट्यावधी रूपये

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More