नवी मुंबई | हसत खेळत तणावमुक्ती या व्याख्यानाला राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी हजेरी लावली आणि व्याख्यान देखील दिले. त्यांनी यावेळी मी आज खऱ्या अर्थाने तणावमुक्त झालो, असे म्हटले आहे. हसत खेळत राहिल्याने तणाव कमी होतो, या कार्यक्रमात आल्यानंतर मी खऱ्या अर्थाने तणावमुक्त झालो. गृहमंत्रीपदाचा भार कमी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि आमदार प्रथमच नवी मुंबईतील (Navi Mumbai) नेरुळ येथे आयोजित कार्यक्रमात आले होते.
यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavhan) प्रतिष्ठानच्या नवी मुंबई केंद्राच्यावतीने नेरुळ येथे पुण्यातील योग तज्ज्ञ अशोक देशमुख (Ashok Deshmukh) यांच्या हसत खेळत तणावमुक्ती या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वळसे पाटील आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड (Pramod Karnad) यांनी यावेळी माहिती दिली.
हसत खेळत तणावमुक्ती या व्याख्यानाला प्रेक्षकांनी दोन तास भरभरुन दाद दिली. हा कार्यक्रम पाहून मी सतत हसत होतो. त्यामुळे हा कार्यक्रम पाहून मी तणावमुक्त झालो असे वळसे पाटील म्हणाले.
त्यांच्या पत्नी किरण वळसे पाटील (Kiran Dilip Valse Patil) यांनीही या कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी नवी मुंबई मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर, बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष काशिनाथ मोरे, ऐरोली ज्येष्ठ नागरीक संघ अध्यक्ष बबन पाटणकर यांना प्रतिष्ठानच्या कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
थोडक्यात बातम्या –
बंडखोर आमदारांविरोधातील याचिकेवर आज सुनावणी नाही?, अत्यंत महत्त्वाची समोर
महाविकास आघाडी संदर्भात शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
शिंदे सरकारचं भवितव्य ठरणार, बंडखोर आमदारांविरोधातील याचिकेवर आज सुनावणी
वारकऱ्यांसाठी पंढरपूरात दानवे बनले चहावाला, दमलेल्या वारकऱ्यांसाठी स्वत: बनवला चहा
‘वाय’ चित्रपटाने प्रेरित होत कोल्हापुरातील दाम्पत्याने साजरा केला बारशाचा अनोखा कार्यक्रम
Comments are closed.