गांधीजींना नथुरामच्या हल्ल्यातून वाचवणाऱ्या गुरुजींचं निधन

सातारा | महात्मा गांधीजींना नथुरामच्या हल्ल्यातून वाचवणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भि.दा.भिलारे गुरुजी यांचं आज पहाटे महाबळेश्वरजवळील भिलार येथे निधन झालं. ते ९८ वर्षांचे होते.

पाचगणीत प्रार्थनेवेळी नथुरामने महात्मा गांधींवर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या भिलारे गुरुजींनी नथुरामला पकडून चोप दिला होता. 

दरम्यान, आज दुपारी ३ वाजता भिलारे गुरुजींच्या पार्थिवावर भिलारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…