बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एका महिन्यात 16 वेळा इंधन दरवाढ; इंधनदरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनामुळे कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यातच गेल्या तीन महिन्यांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिरावल्या होत्या. पण आता हळूहळू इंधन दरवाढ होत असताना पाहायला मिळत आहे. देशातील पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर लगेचच इंधन दरवाढीला वेग आल्याचं दिसून येत आहे.

मागच्या एका महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 16 वेळा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोलने शंभरीचा आकडा यापुर्वीच पार केला आहे. दरम्यान,  आज पेट्रोलच्या किमतीत 34 पैसे तर डिझेलच्या किमतीत 30 पैशांची वाढ करण्यात आली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानंतर मुंबईतील पेट्रोलची आजची किंमत 104.90 रुपये प्रति लिटर एवढी असून डिझेलची किंमत 96.72 रुपये प्रति लिटर एवढी आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिरावल्या होत्या, तसेच काही प्रमाणात कमी देखील करण्यात आल्या होत्या.

निवडणुका संपल्यानंतर लगेचच संपूर्ण देशात इंधन दरवाढीचा भडका उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जवळपास 56 दिवस निवडणुकांचे बिगुल वाजताच इंधन दरवाढ थांबवण्यात आली होती. यामुळे तेल कंपन्यांवर मोठा आर्थिक बोजा पडला होता. ती आर्थिक तूट आता भरून काढण्याचा प्रयत्न तेल कंपन्या करत असल्याचं काही तज्ज्ञांनी बोलून दाखवलं. त्यामुळे सरकार नेमका इंधन दरवाढीवर निर्णय घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

ओबीसी आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांची ‘युज अँड थ्रो’ची भूमिका – एकनाथ खडसे

पोटनिवडणुकांबाबत ठाकरे सरकारचा निर्णय पक्का; थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

अखेर ट्विटरने हटवला भारताचा चुकीचा नकाशा; जम्मू काश्मीर आणि लडाख वेगळा देश दाखवल्याने पेटला वाद!

‘फडणवीस RSSच्या शिकवणीप्रमाणे आरक्षण संपवायला निघालेत’; काँग्रेसचा हल्लाबोल

इस्रायली तंत्रज्ञानाद्वारे मुंबईच्या समुद्रातील 200 दशलक्ष लिटर खारं पाणी होणार पिण्यायोग्य

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More